बातम्या
पतीने बळजबरीने केलेले शरीरसंबंध बेकायदेशीर मानले जाऊ शकत नाही - मुंबई सत्र न्यायालय
वैवाहिक बलात्काराबाबत केरळ हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर, एका सत्र न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, पतीने जबरदस्तीने केलेले शारीरिक संबंध बेकायदेशीर मानले जाऊ शकत नाहीत.
बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या पतीला मुंबई न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. महिलेचे गतवर्षी लग्न झाले, लग्नानंतर लगेचच तिच्या पतीसह कुटुंबीयांनी पैशांची मागणी केली. लग्नानंतर महिनाभरानंतर पतीने पत्नीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. महाबळेश्वरला गेल्यावर त्याने पुन्हा तिच्या इच्छेविरुद्ध त्याची पुनरावृत्ती केली. त्यानंतर, पत्नीने अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली आणि डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेली. तिच्या शरीराच्या खालच्या भागात अर्धांगवायू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
महिलेने तिच्या पतीविरुद्ध एफआयआर नोंदवला, ज्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने म्हटले की, मुलीला अर्धांगवायू झाला हे दुर्दैवी आहे; तथापि, अर्जदारास त्यासाठी जबाबदार धरता येणार नाही.
लेखिका : पपीहा घोषाल